वेस्ट इंडिजने १९९१ नंतर प्रथमच पाकिस्तानविरुद्ध वन डे मालिका जिंकली.
तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा २०२ धावांनी पराभव झाला, संघ फक्त ९२ धावांवर गारद.
विंडीजचा जेडन सील्सने १८ धावांत ६ विकेट्स घेतल्या, शे होपने शतक ठोकले.
Shoaib Akhtar slams Pakistan cricket after WI series loss : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजने १९९१ नंतर प्रथमच पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका जिंकली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात २९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ९२ धावांवर तंबूत परतला. पाकिस्तानचा २०२ धावांनी पराभव झाला. वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज जेडन सील्सने १८ धावांत ६ विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत कर्णधार शे होपने शतकी खेळी केली.