Craig Miles announces retirement from professional cricket at 32
esakal
England fast bowler Craig Miles retirement news: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग माइल्सने अवघ्या ३२ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला. १५ वर्षांच्या कारकीर्दित क्रेगने सर्व फॉरमॅटमध्ये मिळून ५०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडकडून मर्यादित षटकांच क्रिकेट खेळलेल्या ग्लोऊसेस्टरशायरच्या गोलंदाजाने आता आणखी क्रिकेट खेळण्याची क्षमता उरली नसल्याचे सांगितले. त्याने या खेळाचा त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचेही कारण सांगितल. २०१० मध्ये Gloucestershire कडून पदार्पण केल्यानंतर ते आतापर्यंत तो क्लबसाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजापैकी एक आहे. निवृत्ती जाहीर करताना तो थोडा भावनिक झाला, परंतु हिच योग्य वेळ असल्याचे त्याने म्हटले.