
Australia all-rounder Marcus Stoinis retire from ODI : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याचे चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणे अवघड होऊन बसलेले असताना कांगारूंना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा स्टार ऑल राऊंडर मार्कस स्टॉयनिस याने अचानक वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या स्टॉयनिसने वन डे क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे, परंतु तो ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये राष्ट्रीय संघाकडून खेळणार आहे.