धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Sri Lankan cricket coach dies : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्याच्या काही तास आधी श्रीलंकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचे क्रिकेट प्रशिक्षक सुमित फर्नांडो यांचा कोलंबो येथे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Sri Lankan cricket coach Sumith Fernando dies after alleged altercation with players

Sri Lankan cricket coach Sumith Fernando dies after alleged altercation with players

Updated on

Sri Lankan cricket coach death shocking news before IND vs SL Test: भारत-श्रीलंका यांच्यातल्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे आणि त्यापूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेट वर्तुळाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षक सुमिथ फर्नांडो यांचे खेळाडूंसोबत झालेल्या भांडणात निधन झाले आहे. कोलंबो येथील क्रिकेट क्लबमध्या पाण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि तो एवढा वाढला की १७ वर्षीय खेळाडू फर्नांडो यांना मारले. फर्नांडो हे श्रीलंकेतील नावजलेल्या प्रशिक्षकांपैकी एक होते आणि श्रीलंकेच्या वन डे संघाचा कर्णधार कुसल मेंडिस याला सुरुवातीच्या काळात त्यांनी मार्गदर्शन केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com