वेस्ट इंडिज संघाचा सदस्य असलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजच्या या क्रिकेटपटूवर ११ महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या क्रिकेटपटूचे नाव अद्याप उघड झालेले नसले तरी, तो सध्याच्या संघाचा भाग आहे. SportsMax TV ने दिलेल्या दाव्यानुसार या खेळाडूवर अनेक महिलांनी अत्याचाराचा आरोप केला आहे आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहेत. या आरोपाचा तपास सुरू केला गेला आहे.