
श्रेयस अय्यरला सूर्यकुमार यादवच्या जागी ट्वेंटी-२० कर्णधार करण्याची चर्चा रंगली आहे.
अय्यरने २०२५ च्या आयपीएलमध्ये १७५ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटसह ६००+ धावा केल्या होत्या.
कोलकाता नाईट रायडर्सला अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल विजेतेपद मिळाले होते.
Will Shreyas Iyer replace Suryakumar Yadav as India’s T20 captain? श्रेयस अय्यरला भारतीय ट्वेंटी-२० संघाचा पुढील कर्णधार म्हणून पुढे केले जात आहे. २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सूर्यकुमार यादवच्या जागी कर्णधारपदी श्रेयसच्या नावाची चर्चा आहे. पण, भारताचा जलदगती गोलंदाज संदीप शर्मा याने या सर्व चर्चा खोडून काढल्या आहेत. यात कोणतेच तथ्य नसल्याचे त्याने स्पष्ट केले. श्रेयसच्या नेतृत्वाखाली मागील दोन आयपीएल पर्वात संघांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यात त्याने कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद पटकावून दिले होते.