Shreyas IyerSakal
Cricket
Shreyas Iyer मुंबई संघाचा कर्णधार, रहाणेही खेळणार; रणजी सामन्यातून वगळलेल्या पृथ्वी शॉ यालाही संधी
Mumbai Squad for Syed Mushtaq Ali T20 Trophy 2024-25: आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबई संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यर याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
Syed Mushtaq Ali T20 Trophy 2024-25: भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामाचा पहिला टप्पा नुकताच संपला. आता दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी २३ नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धा खेळवली जाणार आहे.
याच स्पर्धेसाठी मुंबई संघाचीही निवड करण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबई संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर याच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याने काही महिन्यांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करताना आयपीएल २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.

