IND vs IRE 1st T20I: कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची टीम सोबत पहिली मिटींग, वैभव सूर्यवंशीचं कसं झालं स्वागत? पाहा Video

BCCI shares Vaibhav Sooryavanshi welcome video: भारत-आयर्लंड पहिल्या टी-20पूर्वी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून पहिली टीम मीटिंग पार पडली. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे संघात टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले असून BCCI चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IND vs IRE 1st T20I

IND vs IRE 1st T20I

esakal

Updated on

BCCI shares Vaibhav Sooryavanshi welcome video: भारत आणि आयर्लंड यांच्यात(IND vs IRE) २ टी-२० सामन्यांची मालिका आजपासून खेळली जाणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष लागलं आहे ते १५ वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीकडे(Vaibhav Sooryavanshi). आज त्याचं आयर्लंडविरुद्ध पदार्पण झालं, तर तो भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरेल.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं संघात झालेलं स्वागत आणि कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची संघासोबतची पहिली टीम मीटिंग पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com