
बंगळूर : भारतीय संघातून दुर्लक्षित होत असलेला श्रेयस अय्यर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्यासह आशिया करंडक स्पर्धेत स्थान न मिळालेला यशस्वी जयस्वालही कंबर कसून तयार झाला आहे. या दोघांसह शार्दुल ठाकूरच्याही कामगिरीकडे लक्ष असणार आहे.