Will Shubman Gill Enter India’s T20 World Cup Squad? BCCI Reacts
esakal
Tilak Varma injury impact on India T20 World Cup squad : फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी न्यूझीलंडविरुद्धची मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. IND vs NZ T20 मालिकेसाठी निवडणारा भारतीय संघच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. भारताचा कसोटी व वन डे संघाचा कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill ) याला वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्याने बरीच चर्चा रंगली. पण, आता त्याला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या ट्वेंटी-२० संघातील स्टार खेळाडू तिलक वर्मा या दुखापतग्रस्त झाला आहे आणि तो किवीविरुद्धच्या मालिकेत मुकण्याची शक्यता आहे.