
भारतीय क्रिकेट संघाचा युवा तारा शुभमन गिल याने इंग्लंड दौऱ्यावर आपल्या नेतृत्वाची आणि फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. या दमदार कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी मोठा दावा केला आहे की, शुभमन गिल लवकरच एकदिवसीय संघाचा कर्णधार होऊ शकतो आणि सध्याचे कर्णधार रोहित शर्मा यांची जागा घेऊ शकतो. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. यासह गिलने वैयक्तिकरित्या 754 धावांसह मालिकेत सर्वाधिक धावा केल्या.