
गेल्या दोन महिने कसोटी क्रिकेट भारत आणि इंग्लंड संघांनी गाजवलं. या दोन संघात झालेली रामांचक कसोटी मालिका अखेर २-२ अशी बरोबरीत सुटली. शुभमन गिलने भारतीय संघाचे नेतृत्व करताना, तर बेन स्टोक्सने इंग्लंडचे नेतृत्व करताना दमदार कामगिरी केली.
पण आता पुन्हा एकदा हे दोघे आमने-सामने आहेत, पण क्रिकेटच्या मैदानात नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) देण्यात येणाऱ्या एका पुरस्कारासाठी.