
शुभमन गिलने जुलै 2025 साठीचा ICC Men’s Player of the Month पुरस्कार जिंकला.
इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेत गिलने 754 धावा ठोकल्या.
जुलै महिन्यातील तीन कसोट्यांमध्ये त्याची धावसंख्या 567, सरासरी 94.50 होती.
Shubman Gill ICC Men’s Player of the Month award for July 2025 : भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठीची पाच सामन्यांची कसोटी मालिका गाजवली. इंग्लंड दौऱ्यावरील या मालिकेत गिलने सर्वाधिक ७५४ धावा करून अनेक विक्रम मोडले आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला देण्यात येणारा पुरस्कार गिलने पटकावला आहे. जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठीचा पुरस्कार गिलने पटकावताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्यावर पुन्हा कुरघोडी केली आहे.