Shubman Gill : शुभमन गिलला संघातून वगळले, पुनरागमन लांबणीवर पडले; निवड समितिच्या निर्णयाने सर्वच अचंबित

Shubman Gill Returns To Punjab Squad: विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबच्या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिक्कीमविरुद्धच्या सामन्यासाठी केवळ कर्णधारपदच नाही, तर संघातही गिलचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याचं देशांतर्गत क्रिकेटमधील पुनरागमन लांबणीवर पडलं आहे.
Shubman Gill selected for Punjab Vijay Hazare Trophy squad

Shubman Gill selected for Punjab Vijay Hazare Trophy squad

esakal

Updated on

Why Shubman Gill dropped from Punjab Vijay Hazare Trophy squad? न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. या मालिकेतून कर्णधार शुभमन गिल भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याची शक्यता आहे. ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी शुभमन विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पंजाबकडून दोन सामने खेळणार असल्याची चर्चा होती. पण, पंजाबचा संघ आज जयपूर येथे सिक्कीमविरुद्ध मैदानावर उतरला आणि प्लेइंग इलेव्हनमधून शुभमनचे नाव गायब दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अभिषेक शर्माच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे कर्णधारपदाची माळ दिली जाईल, असेही वाटले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com