England media slams Gill for breaking ICC code in Headingley Test भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंग्ले कसोटीत शानदार शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल वादात अडकला आहे. त्याची चर्चा होण्याचे कारण त्याची मैदानावरील कामगिरी नाही, तर त्याचे काळे मोजे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल काळे मोजे घालून मैदानावर फलंदाजी करण्यासाठी आला होता, जे आयसीसीच्या ड्रेस कोडच्या नियमांविरुद्ध आहे. इंग्लिश मीडियाने हा मुद्दा उचलून धरला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसतेय.