

Shubman Gill No.1 ODI batsman ICC rankings update : आठ वर्षाने होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना कराचीत खेळला जातोय आणि पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ वर्षानंतर पाकिस्तानात होत असलेल्या या स्पर्धेची तेथील नागरिकांना उत्सुकता आहे आणि बाबर आजम ( Babar Azam) या प्रमुख खेळाडूकडून सर्वांना अपेक्षा आहे. पण, टॉस होताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) बाबर आजमला झटका दिला.