आमच्याकडे १-२ मॅच खेळू शकतील असेही खेळाडू नाहीत! शुभमन गिलने पराभवाचं खापर 'फिटनेस'वर फोडले; म्हणाला, वर्ल्ड कपमध्ये...

India vs England ODI series Shubman Gill press conference: इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने संघातील खेळाडूंच्या फिटनेसबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे संघाची संयोजना वारंवार बदलावी लागत असल्याने त्याचा थेट परिणाम कामगिरीवर होत असल्याचे गिलने स्पष्ट केले.
Shubman Gill blames player fitness after England ODI series loss

Shubman Gill blames player fitness after England ODI series loss

esakal

Updated on

Shubman Gill blames player fitness after England ODI series loss : भारतीय संघाला आणखी एका मालिकेत पराभव पत्करावा लागला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया ( २-१), न्यूझीलंड ( २-१) आणि आता इंग्लंडविरुद्धच्या ( २-१) वन डे मालिकेत हार पत्करावी लागली. भारतीय संघ २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी करत असताना असे पराभव चिंता वाढवणारे आहेत. त्यात कर्णधार शुभमन गिलने वस्तूस्थिती समोर मांडली. त्याने या पराभवामागे खेळाडूंची वारंवार दुखापत कारणीभूत असल्याचे मत मांडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com