India squad for World Cup 2027: शुभमन गिल-रोहित शर्मा ओपनर; शमी, भुवीचे पुनरागमन! वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी रवी शास्त्रींनी निवडला भारतीय संघ

Ravi Shastri reveals India squad for World Cup 2027: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२७ अजून काही काळ दूर असला तरी भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या पसंतीचा भारतीय संघ जाहीर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Ravi Shastri India World Cup 2027 squad prediction

Ravi Shastri India World Cup 2027 squad prediction

Updated on

India squad for ICC Cricket World Cup 2027: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांचा १५ सदस्यीय संघ निवडला आहे. त्यांनी शुभमन गिलला कर्णधारपदी कायम राखले आहे आणि सलामीवीर म्हणून रोहित शर्माचीच निवड केली आहे. याशिवाय अनुभवी फलंदाज विराट कोहली हाही संघात आहे. शास्त्री यांच्या संघात बरेच दिवस भारतीय संघाबाहेर असलेल्या मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत यांचे पुनरागमन झाले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या इशान किशनला मात्र त्यांनी संधी दिलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com