रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर शुभमन गिलला कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सूर्यकुमार यादव सध्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करतो, पण भविष्यात गिलकडे ही जबाबदारी जाण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यर वन डे कर्णधारपदाच्या शर्यतीत असल्याने तीन फॉरमॅटसाठी दोन कर्णधार ठरतील, हे स्पष्ट झाले आहे.
Shubman Gill future captaincy plans for Team India : भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत.. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रोहितने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करतोय. सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया चषक स्पर्धा खेळण्यास सज्ज झाली आहे. रोहित आता फक्त वन डे क्रिकेट खेळतोय आणि ३८ वर्षीय खेळाडूच्या जागी कर्णधाराचा शोध सुरू झाला आहे. श्रेयस अय्यर याचे नाव आघाडीवर आहे. त्यातच सूर्यकुमारनंतर ट्वेंटी-२० संघाच्या नेतृत्वाची चर्चा आतापासून सुरू झाली आहे.