
मँचेस्टर : दुसरा कसोटी सामना चालू होण्याअगोदर प्रश्न विचारणारा तो माझा पत्रकार मित्र कुठे आहे? शुभमन गिल गालातल्या गालात हसत विचारत होता. झाले असे होते की दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत एका स्थानिक इंग्लिश वर्तमानपत्राच्या पत्रकाराने मुद्दाम एजबॅस्टन मैदानावर भारतीय संघाने एकही कसोटी सामना जिंकला नाही, हा इतिहास तुला माहीत आहे ना? गिलने उत्तर देताना सांगितले होते, मागे काय घडले यात मी रमत नाही.