शुभमन गिल आशिया चषक 2025 मध्ये सहभागी होणार नसल्याची शक्यता आहे.
त्याला दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये उत्तर विभागाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात गिलने 754 धावा करत शानदार कामगिरी केली आणि 'प्लेअर ऑफ दी सीरिज' ठरला
Why is Shubman Gill not playing Asia Cup 2025? विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या कसोटीतून निवृत्तीनंतर २५ वर्षीय शुभमन गिल याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्व आले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पहिलाच दौरा हा इंग्लंडचा होता आणि तिथे यंगिस्तानने अविश्वसनीय कामगिरीकरून सर्वांना थक्क केले. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दोनवेळा पुनरागमन करून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. शुभमनच्या या संघाला इंग्लंडने हलक्यात घेण्याची चूक केली आणि या संघाने आपला दम दाखवला. आता भारतीय खेळाडू आशिया चषक २०२५ स्पर्धेपर्यंत विश्रांतीवर आहेत. पाच आठवड्याच्या विश्रांतीनंतर आशिया चषक स्पर्धा सुरू होणार आहे, परंतु यामध्ये शुभमन गिल खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे.