शुभमन गिल vs रवींद्र जडेजा! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचे दोन शिलेदार एकमेकांसमोर... जाणून घ्या नेमकं काय घडलंय

Shubman Gill vs Ravindra Jadeja Ranji Trophy match: न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचे दोन प्रमुख शिलेदार आता एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हे दोघेही थेट राजकोटकडे रवाना होण्याची शक्यता असून, रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये ते प्रतिस्पर्धी संघांकडून खेळताना दिसू शकतात.
captain Shubman Gill and Ravindra Jadeja are set to face each other in the Ranji Trophy

captain Shubman Gill and Ravindra Jadeja are set to face each other in the Ranji Trophy

esakal

Updated on

India captain Shubman Gill returns to Ranji Trophy: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने भारतात प्रथमच वन डे मालिका जिंकली. या मालिकेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. कर्णधार शुभमन गिलने पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतकीय खेळी केली, परंतु तिसऱ्या लढतीत तो अपयशी ठरला. या मालिकेत रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता भारतीय खेळाडू ट्वेंटी-२० मालिकेच्या तयारीला लागले असताना शुभमन गिल व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) हे समोरासमोर येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com