Shubman Gill stays calm after a Pakistani fan chants “Pakistan Zindabad” during his Adelaide walk; video goes viral.
esakal
Pakistani fan interrupts Shubman Gill in Adelaide : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना गुरुवारी एडिलेड येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलचा अॅडलेडच्या रस्त्यावर भटकंती करत होता. तेव्हाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, कारण या व्हिडीओत एक पाकिस्तानी क्रिकेट चाहता टीम इंडियाच्या कर्णधारासोबत आधी हात मिळवताना दिसतोय आणि त्यानंतर त्याने 'पाकिस्तान झिंदाबाद' असे म्हणाला. पाकिस्तानी चाहत्याच्या या कृतीवर नेटिझन्सनी शेजाऱ्यांची लायकी काढायला सुरुवात केली आहे.