शुभमन गिलची लॉर्ड्स कसोटीतील स्वाक्षरी केलेली जर्सी ५.४१ लाखांना 'रेड फॉर रुथ' चॅरिटी लिलावात विकली गेली.
बुमराह आणि जडेजा यांच्या जर्सी प्रत्येकी ४.९४ लाखांना विकल्या गेल्या, तर लोकेश राहुलच्या जर्सीला ४.७० लाख बोली मिळाली.
इंग्लंडच्या जो रूट आणि बेन स्टोक्स यांच्या जर्सींनाही मोठ्या बोली लागल्या.
Red For Ruth charity cricket memorabilia sale : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी लॉर्ड्सवर झालेल्या इग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याची जर्सी ५.४१ लाखांना लिलावात विकली गेली आहे. रेड फॉर रुथ चॅरिटीसाठी हा लिलाव ठेवण्यात आला होता आणि त्याता भारत-इंग्लंड क्रिकेटपटूंच्या क्रिकेटमधील वस्तू लिलावासाठी ठेवल्या गेल्या होत्या. यामध्ये शुभमनने स्वाक्षरी केलेल्या जर्सीला सर्वाधिक भाव मिळाला.