Siddhesh Lad: सिद्धेश लाडचे शानदार शतक; रणजी, तीन बाद ७४ नंतर मुंबईची मजल पाच बाद ३३६
Ranji Trophy 2025: सिद्धेश लाडच्या ११६ आणि शम्स मुलानीच्या नाबाद ७९ धावांच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत जम्मू-काश्मीरविरुद्ध पहिल्या दिवसअखेर पाच बाद ३३६ धावा केल्या. मुंबईच्या मधल्या फळीने डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावली.
श्रीनगर : सिद्धेश लाडचे शतक (११६) आणि शम्स मुलानीच्या नाबाद ७९ धावांच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात जम्मू-काश्मीरविरुद्ध पहिल्या दिवसअखेर पाच बाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली.