Shikhar Dhawan | Virender Sehwag
Shikhar Dhawan | Virender SehwagSakal

Shikhar Dhawan Retirement: 'मोहालीत तू मला रिप्लेस केलं अन्...', शिखरसाठी सेहवागची ती पोस्ट चर्चेत; गंभीर-रैनाही झाले व्यक्त

Cricket Fraternity reacted on Shikhar Dhawan Retirement: शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून यावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

Shikhar Dhawan Retirement: गब्बर नावाने ओळखला जाणाराभारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शनिवारी (२४ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्याने एक व्हिडिओ शेअर करत याबाबत सर्वांना माहिती दिली.

शिखरने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने अनेकदा मोठ्या खेळी करत भारताला विजय मिळवून दिले आहेत. पण आता १४ वर्षांनंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

त्याच्या या निर्णयावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये विरेंद्र सेहवागने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्याने आठवण करून दिली की शिखरने त्याची संघातील जागा घेतली होती.

Shikhar Dhawan | Virender Sehwag
IPL 2025 मध्ये शिखर धवन खेळणार नाही? निवृत्तीनंतर तो घेऊ शकतो आणखी एक मोठा निर्णय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com