
Sir Don Bradman Cap Sold For 2.63 Crore : भारताच्या १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटच्या कसोटी मालिकेत सर डॉन ब्रॅडमन यांनी परिधान केलेली टोपी २ कोटी ६३ लाख रुपयांना विकली गेली. ही टोपी जवळजवळ ८० वर्षे जुनी आहे. हा केवळ मोठ्या किंमतीचा टॅग नसून, या टोपीमागे इतिहास आहे. सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांनी त्या कसोटी मालिकेतील सहा डावांत १७८.७५ च्या सरासरीने ७१५ धावा केल्या होत्या. त्यांनी या मालिकेत तीन शतके व एक दुहेरी शतकही ठोकले. या मालिकेत भारताचा ४-० ने पराभव झाला होता.