

Gautam Gambhir
sakal
गुवाहाटी : भारतीय क्रिकेट संघाला कोलकाता कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावरील दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका होऊ लागली. हाच धागा पकडून भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी गौतम गंभीर यांची पाठराखण करताना त्यांच्यावरील टीका चुकीची असल्याचे म्हटले आहे.