SL vs BAN 1st Test: 'आमच्याकडे चॅम्पियन्स ट्रॉफीची जर्सी आहे, तुमच्याकडे...'; बांगलादेशच्या चाहत्याचा 'वेडेपणा' झाला असह्य, श्रीलंकेच्या फॅन्सने काढली लाज, Viral Video

Sri Lankan fans give savage reply to Bangladesh supporter : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात मैदानावर जितकी रंगत होती, तितकीच स्टँडमधील फॅन्समध्येही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. एक बांगलादेशी चाहता चॅम्पियन्स ट्रॉफीची जर्सी घालून श्रीलंकन फॅन्सना चिडवत होता.
Bangladeshi Fan, Sri Lankan Fan
Bangladeshi Fan, Sri Lankan Fan
Updated on

Cricket fan banter turns into viral moment during BAN vs SL

बांगलादेश-श्रीलंका यांच्यातला सामना चुरशीचा सुरू आहे. बांगलादेशच्या पहिल्या डावातील ४९५ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ८ बाद ४७० धावा केल्या आहेत. या सामन्याचा निकाल ड्रॉ लागणार हे स्पष्ट झाले आहे. मैदानावर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना टक्कर देत असताना मैदानाबाहेरही वातावरण तापलेले दिसले. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या चाहत्यांचा एक Video Viral झाला आहे आणि तो लोकांना खूप आवडतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com