
INDU19 vs SLU19 Semi Final Asia cup: भारत आणि श्रीलंका हे दोन तगडे संघ १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत समोरासमोर आले आहेत. चेतन शर्माने सलग दोन चेंडूंत विकेट्स घेऊन भारताला चांगली सुरुवात करून दिली, परंतु शारूजन शनमुगनाथन व लकवीन अबेयसिंघे यांनी श्रीलंकेचा डाव सावरला आहे. या सामन्यात तिसऱ्याच षटकात मजेशीर किस्सा घडला.