
Shreyas Iyer Praised Prithvi Shaw and Gave Advice: मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्र्रॉफी स्पर्धेतच दुसरे विजेतेपद पटकावले. देशांतर्गत क्रिकेटमधले मुंबईचे हे ६२ वे विजेतेपद आहे. मुंबईचा सलामीवीर त्याच्या खराब फॉर्ममुळे व आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. SMAT 2024 स्पर्धेतही त्याची कामगिरी काही खास राहिलेली नाही. त्याने स्पर्धेच्या ९ सामन्यांमध्ये अवघ्या १९७ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही. पण तरीही मुंबईच्या कर्णधाराने पृथ्वीवर विश्वास दाखत त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.