

Mumbai vs Vidarbha SMAT QF : पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांच्या वादळी खेळीने मुंबईला आशेचा किरण दाखवला होता. पण, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर यांच्या अपयशामुळे मुंबईला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला असता. पण, अजिंक्य रहाणेला सलग दुसऱ्या सामन्यात शतकाने हुलकावणी दिली. शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांनी वादळी खेळी करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. मुंबईला शेवटच्या ४ षटकांत ६० धावा हव्या होत्या आणि सूर्यांशने १७व्या षटकात २४ धावा कुटून मॅच फिरवली.