
Mumbai vs Madhya Pradesh SMAT Final 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला व सुंदर सुरूवात केली. मध्यप्रदेशच्या आघा़डीच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करण्यात मुंबईला यश आले. पण त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने २८ चेंडूत अर्धशतक ठोकत मध्यप्रदेशचा डाव सावरला आणि मुंबईला विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य दिले.