Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे तुफानी शतक; पहिल्या ट्वेन्टी-२० मध्ये भारताकडून इंग्लंडचा धुव्वा
Womens Cricket : स्मृती मानधनाच्या ५१ चेंडूंतील शतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. श्री चरणीने चार बळी घेत इंग्लंडच्या डावाला पूर्णपणे खिंडार पाडले.
नॉटिंगहॅम : नेतृत्व करीत असलेल्या स्मृती मानधनाने झळकावलेल्या वेगवान शतकाच्या जोरावर द्विशतकी धावा करणाऱ्या भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडचा ९७ धावांनी धुव्वा उडवला.