Smriti Mandhana : प्रेमाची ५ वर्षे! नॅशनल क्रश स्मृती मानधनाने बॉयफ्रेंडबरोबर केलं सेलिब्रेशन

Smriti Mandhana and Palash Muchhal Relationship : भारतीय संघांची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना तिच्या खेळासह तिच्या सौंदर्यासाठी देखील चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
smriti mandhana palash muchhal relationship 5 years
smriti mandhana palash muchhal relationship 5 yearsSAKAL

Smriti Mandhana and Palash Muchhal Relationship : भारतीय संघांची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना तिच्या खेळासह तिच्या सौंदर्यासाठी देखील चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नॅशनल क्रश मानल्या जाणाऱ्या स्मृती मंधानाचं प्रेमाचं नातं आता कोणापासून लपून राहिलेले नाही तसेच तिने आपले नाते उघडपणे स्वीकारले आहे. स्मृती गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि तिने 7 जुलै 2024 रोजी तिच्या बॉयफ्रेंडसोबत याबद्दलचे सेलेब्रेशनही केले आहे.

smriti mandhana palash muchhal relationship 5 years
IND vs ZIM: शतक करण्यासाठी अभिषेकला लकी ठरली शुभमन गिलची बॅट, सामन्यानंतर उलगडलं मोठं रहस्य

स्मृतीच्या प्रियकराचं नाव पलाश मुच्छल आहे. इंटरनेटवर स्मृतीच्या प्रियकरासंबंधीत अनेक चर्चा रंगल्या होत्या. दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो देखील शेयर केले होते. पलाशने सोशल मिडियावर त्यांचा फोटो शेयर करत आपल्या रिलेशनशीपला ५ वर्ष पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. रविवारी स्मृतीसोबत केक कापत असतानाचा फोटो आणि त्यासह कॅप्शनमध्ये ५ हार्ट इमोजी दिले. याचाच अर्थ असा की, त्याच्या नात्याला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

पलाश हा मध्य प्रदेशमधाील इंदौरचा आहे. तो एक गायक आहे. जो बॉलिवूड आणि जाहीरातींसाठी गाणे गातो. त्याची मोठी बहीण पलक मुच्छल देखील गायक आहे. पलाश आणि स्मृतीची ओळख तशी जुनीच आहे. एकदा पलाश स्मृतीच्या २७व्या वाढदिवसाचं सरप्राईज देण्यासाठी ढाका येथे गेला होता.

smriti mandhana palash muchhal relationship 5 years
Sourav Ganguly Birthday : सौरव गांगुलीने वडिलांचा 'तो' सल्ला ऐकला नाही अन् पुढे इतिहास घडला...

आरसीबीने जेव्हा WPL 2024 चा खिताब जिंकला होता, तेव्हा कर्णधार स्मृती आणि पलाशचा एकत्रीत फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. मैदानावर पलाशने स्मृतीला मीठी मारून शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने स्मृतीच्या खांद्यावर हात ठेवून ट्रॉफीसोबत फोटो काढला होता.

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये व्यक्त केलेलं प्रेम

पलाशने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये स्मृतीसाठी एक गाणे समर्पित केले होते आणि आपले प्रेम देखील व्यक्त केले होते. एकप्रकारे पलाशने मानधनाचा प्रस्ताव स्वीकारला होता आणि 'आय लव्ह यू स्मृती' असे म्हटले होते.

स्मृती मानधना सध्या चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत आणि कसोटी सामन्यात तीने चमकदार कामगिरी केली होती. ती सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com