

Smriti Mandhana
esakal
दुबई : अनुभवी फलंदाज व उपकर्णधार स्मृती मानधना हिने ६४ चेंडूंमध्ये झळकावलेल्या १२४ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी हाँगकाँगवर १३७ धावांनी शानदार विजय मिळवला आणि आशियाई क्रिकेट या प्रतिष्ठेच्या टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
भारतीय महिला संघाचा अ गटातील हा सलग दुसरा विजय ठरला. याआधी सलामीच्या लढतीत थायलंडला पराभूत करताना भारतीय महिला संघाने उल्लेखनीय खेळ केला होता.