

दुबई, ता. २८ ः भारतामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत १०९ धावांची खेळी साकारणाऱ्या भारताच्या स्मृती मानधना हिने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान कायम राखले असून तिने ८२८ रेटिंगची विक्रमी कमाईही केली आहे. ऑस्ट्रेलियाची ॲश्ले गार्डनर ७३१ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या व दुसऱ्या स्थानामध्ये ९७ रेटिंगचा फरक आहे.