Snehashish Ganguly and wife survive speedboat accident in Odisha : मुंबईसह ( Mumbai Rain) भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. ओडिशातही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि परिस्थितीचा अंदाज बांधणे अनेकांना अवघड झाले आहे. ओडिशाच्या समुद्रकिनारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचा फटका पर्यटकांनाही बसला आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा भाऊ बंगाल क्रिकेट असोसिएशनचे ( CAB) अध्यक्ष स्नेहाशीष गांगुली आणि त्याची पत्नी अर्पिता हे एका अपघातात थोडक्यात बचावले आहे. पुरी समुद्रात त्यांची स्पीडबोट उलटली. बचावपथकाने दोघांनाही वाचवले अन्यथा अनर्थ घडला असता.