लाहोर : दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या (ता. ५) चॅम्पियन्स क्रिकेट करंडकाचा उपांत्य सामना रंगणार आहे. याप्रसंगी दोन्ही देश या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिकन संघ या स्पर्धेच्या दुसऱ्या अन् न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या अंतिम फेरीसाठी सज्ज झाला आहे. सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या प्रकारात या दोन्ही देशांना आतापर्यंत मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे उपांत्य लढतीत दोन्ही देशांचा कस लागेल, हे निश्चित आहे.