

South Africa vs West Indies
sakal
अहमदाबाद : यंदाच्या टी-२० विश्वकरंडकात अपराजित असलेल्या दोन देशांमध्ये उद्या (ता. २६) लढत रंगणार आहे. गत उपविजेता दक्षिण आफ्रिका आणि दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडीज यांच्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे. सुपर-८ मधील गट एकमधील ही लढत दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.