
South Africa vs India 2nd T20I: जिगेबेहरा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियममध्ये झालेल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला ३ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात शेवटपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. मात्र दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकत चार सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
कमी धावसंख्याच्या या सामन्यात भारताकडून वरुण चक्रवर्तीने ५ विकेट्स घेत सामन्यात रोमांच निर्माण केला होता.पण दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रिस्टन स्टब्स आणि गेराल्ड कोएत्झी यांची फलंदाजी महत्त्वाची ठरली.
या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १२५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने १९ षटकात ७ विकेट्स गमावत १२८ धावा करून पूर्ण केला.