
Cricketer Junaid Zafar Khan passing of Junaid Zaffar Khan while fasting in Ramadan: जुनेद जाफर खान नावाचा क्रिकेटपटू सामन्यादरम्यान मैदानावर कोसळला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जुनेद ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड येथे क्लब क्रिकेटचा सामना खेळत होता. रोजा सुरू असताना जुनेद जाफर खान जवळजवळ ४१ डीग्री सेल्सिअस तापमानात क्रिकेट खेळत होता. उपाशीपोटी खेळणारा जुनेद दुपारी ४ वाजताच्या दरम्यान खेळपट्टीवर कोसळला. लगेचच मैदानावर अॅंब्यूलन्स बोलवण्यात आली पण त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
जुनेद जफर खान अॅडलेडमधील कॉनकॉर्डिया कॉलेजमध्ये ओल्ड कॉनकॉर्डियन्स संघाकडून प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्स विरुद्ध सामना खेळत होता. ४० वर्षीय जुनेदला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी झाले.