काव्या मारनच्या मालकीच्या नॉर्दर्न सुपरचार्जर्सने मोहम्मद आमीर आणि इमाद वसीम यांना करारबद्ध केलं.
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.
WCL मध्ये युवराजसिंगच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला आहे.
Kavya Maran’s team ropes in Mohammad Amir and Imad Wasim : इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकिण काव्या मारन हिच्या एका निर्णयाने क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव लक्षात घेता भारताने शेजाऱ्यांसोबत क्रिकेट सामनाही खेळू नये, अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे. जनभावना लक्षात घेऊनच युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडियन चॅम्पियन्स संघाने WCL मध्ये पाकिस्ताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. असं सर्व घडत असताना काव्या मारनने तिच्या संघात दोन पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.