Sri Lanka squad for 1st Test against India 2026
esakal
Sri Lanka Test squad India series latest update: भारताविरुद्धच्या ( IND vs SL ) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे आणि यजमान श्रीलंकेने बुधवारी पहिल्या कसोटीसाठीचा संघ जाहीर केला आहे. १५ ऑगस्टला Galle येथे ही कसोटी खेळवली जाणार आहे आणि त्यासाठी जाहीर केलेल्या संघातून दोन प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. श्रीलंकेसाठी हा खूप मोठा धक्का आहे आणि भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे.