अंपायरशी वाद घालणं भोवलं! ICC ने घेतली ॲक्शन; कर्णधारावर घातली बंदी, काय आहे संपूर्ण प्रकरण?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शनिवारी संध्याकाळी श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sri Lanka captain Wanindu Hasaranga banned Marathi News
Sri Lanka captain Wanindu Hasaranga banned Marathi Newssakal

Sri Lanka captain Wanindu Hasaranga banned : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शनिवारी संध्याकाळी श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेदरम्यान घडलेल्या एका घटनेबाबत ही शिक्षा देण्यात आली आहे.

इतकेच नाही तर आयसीसीने अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानउल्ला गुरबाजलाही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे हसरंगाला पुढील दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तर गुरबाजला मॅच फीचा दंड आणि डिमेरिट पॉइंट्सची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Sri Lanka captain Wanindu Hasaranga banned Marathi News
Ind vs Eng 4th Test : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान वाईट बातमी, BCCI ने ट्वीट करत दिली माहिती

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जर आपण संपूर्ण प्रकरणाबद्दल बोललो तर, वानिंदू हसरंगाचे एकूण डिमेरिट गुण 5 झाले आहेत. या कारणास्तव, नियमांनुसार जर एखाद्या खेळाडूला गेल्या दोन वर्षांत पाच डिमेरिट गुण मिळाले तर त्याच्याकडून 50 टक्के सामना शुल्क आकारले जाते आणि दोन सामन्यांसाठी निलंबित केले जाते.

जर आपण संपूर्ण प्रकरणाबद्दल बोललो तर हसरंगाने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.13 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये, जर एखाद्या खेळाडूने वैयक्तिकरित्या त्याच्या सपोर्ट स्टाफ, पंच किंवा मॅच रेफरी यांना चुकीचे शब्द उच्चारले तर तो दोषी आहे.

Sri Lanka captain Wanindu Hasaranga banned Marathi News
WPL 2024: कोण आहे शोभना आशा? 5 विकेट्स घेत रचला इतिहास, रोमहर्षक सामन्यात RCBचा दोन धावांनी विजय

आफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटच्या सामन्यात हसरंगा अंपायर लिंडन हॅनिबल यांच्याशी भिडला होता. या कारणामुळे तो दोषी ठरला. तो आता पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून तो बाहेर पडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com