Viran Chamuditha highest individual score in U19 World Cup history
esakal
Highest partnership for any wicket in U19 Men’s World Cup: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वैभव सूर्यवंशी, समीर मिन्हास या युवा खेळाडूंच्या नावांची हवा होती. पण, आज श्रीलंकेच्या विरान चामुदिथा ( Viran Chamuditha ) याने जगाला थक्क करणारी खेळी केली. त्याने जपानविरुद्धच्या सामन्यात १४३ चेंडूंत २६ चौकार व १ षटकारासह १९२ धावांची विश्वविक्रमी कामगिरी केली. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने श्रीलंकेच्याच हसिथा बोयागोडाचा २०१८ सालचा विक्रम मोडला. हसिथाने केनियाविरुद्ध १९१ धावा केल्या होत्या.