Stephen Fleming leaves Chennai Super Kings after 15 seasons
esakal
Stephen Fleming leaves Chennai Super Kings after 15 seasons: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ ला सुरूवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आयपीएल २०२७ च्या पर्वात खेळताना दिसणार की नाही, याबाबतची चर्चा सुरू असताना नव्या बातमीने CSK फॅन्सना धक्का दिला आहे. १५ वर्ष संघासोबत असलेला यशस्वी प्रवास मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लेमिंगच्या एक्झिटमुळे आता धोनीच्या मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीला आयपीएल २०२६ मध्ये दुखापतीमुळे खेळता आले नाही आणि आता तो मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसू शकतो, या शक्यता बळावल्या आहेत.