Babar Azam reacts angrily after Steve Smith’s dominant over during a live match.
esakal
Steve Smith humiliates Babar Azam live match video: स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर सिडनी सिक्सर्सने बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी सिडनी थंडरवर दणदणीत विजयाची नोंद केली. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद शतकी खेळीला स्मिथ व बाबर आझम या जोडीने १४१ धावांची मजबूत भागीदारी करून उत्तर दिले. १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मिथ-बाबर जोडीने दमदार खेळ केला, परंतु या दोघांमध्ये एका गोष्टीवरून नाराजीनाट्यही रंगलेलं पाहायला मिळालं. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने लाईव्ह सामन्यात पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची इभ्रत काढली असे म्हटले जातेय.