T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

Steve Smith Replaces Josh Hazlewood in Australia's T20 WC Squad: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने संघात मोठा बदल केला आहे. अनुभवी फलंदाजाला संघात सामील करण्यात आले आहे.
Australia Cricket Team

Australia Cricket Team

Sakal

Updated on

Steve Smith Joins Australia's T20 World Cup Squad: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या संघर्ष करताना दिसतोय. त्यांनी या स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध विजय मिळवून सुरुवात चांगली केली होती. मात्र १३ फेब्रुवारीला त्यांना झिम्बाब्वेने पराभूत करत मोठा धक्का दिला. त्यामुळे या स्पर्धेतील त्यांच्या आव्हानालाही धक्का लागला आहे.

आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना पुढील दोन सामन्यांत विजय आवश्यक आहे. पण याशिवाय ऑस्ट्रेलियाला अनेक दिग्गज खेळाडूंच्या दुखापतीचाही धक्का बसला आहे. पॅट कमिन्स स्पर्धेतून आधीच बाहेर झाला आहे, तर कर्णधार मिचेल मार्शही (Mitchell Marsh) पहिल्या दोन सामन्यात खेळला नाही. त्याच्याऐवजी ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) नेतृत्वाची धुरा सांभाळली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com