Stuart Broad ने भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी संयुक्त XI जाहीर केला, पण शुभमन गिलला डावललं.
गिलने मालिकेत सर्वाधिक 754 धावा करत प्लेयर ऑफ द सीरिज पुरस्कार जिंकला होता.
गिलला वगळून ब्रॉडने चौथ्या क्रमांकासाठी जो रूटची निवड केली कारण तो अधिक अनुभवी आहे.
Why did Stuart Broad drop Shubman Gill from Combined XI? भारत-इंग्लंड कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटल्यानं यजमान इंग्लंडच्या आजी-माजी खेळाडूंचा जळफळाट झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थित पार पडलेल्या मालिकेत शुभमन गिलच्या युवा संघाने यजमान इंग्लंडला तोडीसतोड उत्तर दिले. त्यामुळे ही मालिका खऱ्या अर्थाने यंगिस्तानने गाजवलेली पाहायला मिळाली. पण, इंग्लंडचा महान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने या मालिकेतून भारत-इंग्लंड यांचा संयुक्त एकादश संघ निवडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या संघात मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शुभमन गिलला आणि रवींद्र जडेजाला स्थान दिले नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.